लेन्सकार्टमध्ये वाद महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कंपनीला विरोध

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
मुंबई/भोपाळ/गाझियाबाद
Lenskart controversy आयवेअर कंपनी लेन्सकार्टच्या ड्रेस कोडवरून वाद वाढला आहे. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. हिंदू संघटनांशी संबंधित लोक गेल्या चार दिवसांपासून या राज्यांमधील अनेक शहरांमधील लेन्सकार्ट स्टोअरमध्ये जाऊन कर्मचाèयांना टिळा लावत आहेत आणि कलावा बांधत आहेत.
 
lenskart 
Lenskart controversy यादरम्यान, बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी कंपनीच्या प्रवर्तकांना सांगितले, ‘तू आपली कंपनी लाहोरमध्ये उघड, भारतात कशाला मरतो आहेस? हा तुझ्या काकाचा भारत आहे का? होय! हा आमच्या बापाचा भारत आहे.’
खरं तर, गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर कंपनीचा एक धोरणात्मक दस्तऐवज व्हायरल झाला होता. यात कर्मचाèयांना टिकली, टिळा आणि कलावा घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. हिजाब आणि पगडीला काही अटींसह परवानगी देण्यात आली होती.
हिंदू संघटनांनी कर्मचाऱ्यांना टिळा लावला
Lenskart controversy भोपाळमधील न्यू मार्केट येथील लेन्सकार्ट स्टोअरबाहेर हिंदू उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी कर्मचाèयांना टिळा लावला. मंत्रोच्चारासह कलावा बांधला आणि- ‘सनातनचा अपमान, हिंदुस्तान सहन करणार नाही’, अशा घोषणा दिल्या.
Lenskart controversy हिंदू उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी म्हणाले की, हा हिंदुस्तान आहे, येथे टिळा, कलावा आणि टिकलीचा सन्मान व्हायला हवा. जर कंपनीने यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला, तर ते सहन केले जाणार नाही.
रायपूरमधील लेन्सकार्ट शोरूममध्ये मंगळवारी एका धार्मिक संघटनेचे काही कार्यकर्ते पोहोचले. त्यांनी कर्मचाऱ्यांची नावे विचारली आणि त्यांना टिळा लावून काम करण्यास सांगितले. तसेच, ग्राहकांना त्यांची ओळख सांगण्यासही सांगितले.
यानंतर एका महिलेने आपला चष्मा दाखवत सांगितले की ती याच कंपनीचा चष्मा वापरते, पण आता तो तोडून फेकून देत आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
Lenskart controversy गाझियाबादमधील लोणी येथील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर आपल्या समर्थकांसह लेन्सकार्टच्या शोरूममध्ये पोहोचले. तिथे त्यांनी कंपनीच्या ड्रेस कोडला विरोध केला आणि म्हणाले की, भारतात राहून टिकली आणि कलावा घालण्यावर बंदी घालणे चुकीचे आहे. कंपनीच्या मालकाची चौकशी व्हायला पाहिजे, त्याचे आई किंवा वडील मुस्लिम असतील.