तभा वृत्तसेवा
नेर,
pm-crop-insurance-protection-scheme : यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. चालू खरीप हंगामात जिल्ह्यात दुष्काळग्रस्त स्थिती असतानाता प्रधानमंत्री पीकविमा संरक्षण योजनेतून यवतमाळ जिल्हा वगळण्यात आल्यामुळे शेतकèयांमध्ये तीव्र संताप आहे.
नेर तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्हा प्रधानमंत्री पीकविमा संरक्षण योजनेत समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील खाडे यांच्या नेतृत्वात राकाँच्या वतीने नायब तहसीलदार बकाले यांच्यामार्फत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
शासनाने या निवेदनाची दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अरुण खडसे, युवराज अर्मळ, मधुकर ठाकरे, गजानन गोळे, हरेश्वर कनसे, निलेश धोपे, विठ्ठल खोडे, राजू चोपडे, बाबूजी गोळे, रवींद्र मेंढे, नरेश कोहळे, मुरलीधर पठाडे, आविष तिघरकार, श्रीकृष्ण घोडेस्वार व शेतकरी उपस्थित होते.