वर्धा,
raje-mudhoji-bhosale : छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानणार्या महाराष्ट्राने नेहमी भारतीय संस्कृतीला जोपासण्याचे व वाढविण्याचे महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. संगीत, नाट्य, नृत्य हे भारतीय संस्कृतीचे अंग आहेत. भारतीय संस्कृतीला जगासमोर मांडण्याचे प्रभावी माध्यम नृत्य कला आहे म्हणून नृत्य कलेला भारतीय संस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे असे प्रतिपादन महाराज ऑफ नागपूरचे राजे रघुजी महाराज भोसले यांचे वंशज राजे मुधोजी भोसले यांनी केले.
सचिन डान्स अकॅडमी व लायन्स लब गांधी सिटी वर्धातर्फे आयोजित नृत्योत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री होते. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, ज्येष्ठसमाज सेवक मोहन अग्रवाल, स्वागताध्यक्ष संदीप चिचाटे, दीपक सुमड, गणेश अतकर, शुभांगी ठमेंकर, अनिल नरेडी, मुख्य आयोजक प्रमोद वाकडे, संतोष सेलुकर, लायन्स लबचे आशिष पोहाणे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पं. अग्निहोत्री यांनी नृत्य कलेची उत्पत्ती, त्याचा आध्यात्माशी असलेला दृढ संबंध व त्यातून भारतीय संस्कृतीचे जतन यावर भाष्य केले. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या. स्वागताध्यक्ष संदीप चिचाटे यांनी तीन दिवसीय नृत्योत्सवचे आयोजन व त्याची पाश्वभूमी विषद केली. संचालन पल्लवी पुरोहित तर प्रास्ताविक निखील सातपुते यांनी सादर केले.
तीन दिवसांमध्ये २५० वर नृत्य कलाकार त्यांची कला सादर करणार आहे