मजुरा अभावी गहू शेताच उभा

-आदिवासी मजुरांची घर वापसी -शेतकर्‍यांची मात्र तारांबळ

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
अचलपूर, 
return-of-tribal-laborers : खरीप हंगामात पर्‍हाटी , तूर काढून अनेक शेतकर्‍यांनी उशिरा गव्हाची पेरणी केली होती. यावर्षी उन्हाचा पारा अधीक असल्यामुळे व लग्न समारंभासाठी अनेक आदिवासी मजुरांनी घर वापसी केल्यामुळे अचलपूर तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील गव्हाचे पीक अजूनही उभे आहे. मजूर मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांची चांगली तारांबळ उडाली आहे.
 
 
k
 
अचलपूर तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी गव्हाची पेरणी केली होती. आता हाती आलेला गहू कापण्या करीता मजुरच मिळत नसल्यामुळे अनेक भागात शेतकर्‍यांची मोठी तारांबळ उडत आहे. अचलपूर तालुक्यात मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिके भुईसपाट झाली आहेत, पण कापणीसाठी मजूर न मिळाल्याने तयार पीक शेतातच खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. एरवी मेळघाट मधील आदिवासी मजूर बांधव मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी येतात. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर आले होते. परंतु, मार्च महिन्यातच उन्हाचा पारा वाढल्यामुळे तसेच लग्न समारंभ असल्यामुळे आदिवासी मजुरांनी आपल्या गावाकडे घर वापसी केली. गहू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. हाती आलेले पिक शेतातच खराब होण्याची भीती वाढली आहे. स्थानिक मजुरांनी शहराकडे धाव घेतल्याने आणि केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे शेतीकामासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांचीच संख्या कमी झाल्यामुळे मजुरीचे दर प्रचंड वाढले आहेत, जे छोटे शेतकरी आहेत त्यांना तर शेतकी व्यवसायच परवडू शकत नाहीत. आधुनिक यंत्रसामग्री अजुनही अचलपूर तालुक्यात नसल्यामुळे शेतकरी हतबल झाल्याची स्थिती आहे .
 
 
//हार्वेस्टर दाखल पण, शेतकर्‍यांचा नकार
 
 
यंदा प्रथमच अचलपूर तालुक्यात पंजाबमधील गहू काढणी यंत्र (हार्वेस्टर) दाखल झाले आहे. या आधुनिक यंत्राने शेतकर्‍यांचा माल लवकर काढून मिळत असला तरी गव्हाचा गंवडा (जनावरांचा चारा) हार्वेस्टर मुळे मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी हार्वेस्टरकडे पाठ फिरविली आहे. पारंपारिक पद्धतीनेच गहू काढण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे.