28 एप्रिलला ‘सेवा हक्क दिन’

-शासकीय कार्यालय, ग्रामपंचायतीत कार्यक्रम घ्या -जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
right-to-service-day : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सूचनेनुसार, 28 एप्रिल हा दिवस ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.
 
 
jkl
 
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने 28 एप्रिल सेवा हक्क दिवसानिमित्त रोजी शासकीय कार्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम, सेवा बांधिलकी शपथ, अधिनियम व सेवांची माहिती देणे, आदर्श आपले सरकार केंद्राचे उद्घाटन, सेवांची व शुल्कांची माहिती प्रदर्शित करणे, विद्यार्थी, महिला आणि इतर घटकांसमवेत कायद्याविषयी सुसंवाद साधून जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
 
यासोबतच, ग्रामपंचायत स्तरावर विशेष सभेचे आयोजन करणे, ग्रामपंचायत सदस्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची माहिती व प्रत देणे, अधिनियमांची माहिती दर्शविणारे फलक लावणे, सेवा व शुल्काची माहिती देणे, तक्रारींसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत क्यूआर कोड लावणे, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अधिसूचित ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत स्तरावर आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचा उद्घाटन समारंभ आयोजित करणे, असे निर्देश जिल्हाधिकाèयांनी दिले असून नागरिकांना यात सक्रिय सहभाग नोंदण्याचे आवाहन केले आहे.