संस्कारित युवा पिढी समाजासाठी वरदान

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
वेध
गिरीश शेरेकर
Sanskarit yuva piḍhi अलिकडच्या पाच वर्षातल्या युवा पिढीच्या वागणुकीचा अभ्यास केला तर असे लक्षात येईल की, यातील जवळपास ३० टक्के दिशाहीन होत आहेत. समाजमनावर प्रभाव टाकणार्‍या अनेक घटनांमध्ये त्यांचा सहभाग वारंवार आढळून येत आहे. या घटना शांत डोक्याने समजून त्याचे विश्लेषण केले तर असे येते की, संस्कारांचा अभाव त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. अशी मुले कुटुंबासाठी जितकी धोकादायक असतात तेवढीच ती समाजासाठी घातक असतात. याच्या उलट सांगायचे म्हणजे संस्कारित मुले पालकांचे भाग्य असते आणि हीच पिढी पुढे समाजासाठी वरदान ठरत असते. अनेक मुलांनी नावलौकिक मिळविला तर काहींनी बदनामीतून प्रसिद्धी मिळविली आहे.
 
 
youa
 
मादक प्रदार्थांचे सेवन, क्रिकेट सट्टा व लॉटरी, चोरी, गुन्हेगारी, शरीरसुखाच्या आसक्तीत, लफडेबाजीत दिवसागणीक युवा पिढीचा सहभाग वाढतो आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातील उपरोक्त घटना बघा त्यात युवकांचीच संख्या जास्त दिसते. त्यातही सज्ञानाच्या उंबरठ्याजवळ आलेले आणि तो ओलांडलेल्यांची संख्या लक्ष वेधणारी आहे. नुकतीच वयात आलेली ही मुले नेमकं काय करतील याचा अजिबात नेम राहिलेला शिक्षणाच्या नावावर बाहेरगावी राहणारी म्हणा किंवा घरी राहून पालकांना बेवकूफ बनविणारी मुले संगतगुणानेच बिघडत आहेत. पालकांच्या जेव्हा हे लक्षात येते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तुलनेने यात मुलीची संख्या कमी आहे. पण, ज्या आहेत त्यांनी अटकेपार झेंडे गाडले आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास त्या पानटपरीवरून सिगारेट, वाईनशॉपमधून दारू घ्यायलाही मागेपुढे नाहीत. पब व हॉटेलमध्ये होणार्‍या पार्ट्यांमध्ये गाजांच्या, एमडीच्या सिगारेट त्या मुलांसोबत सर्रास ओढतात. राज्यभरात अशा पार्ट्यांवर अनेकदा झालेल्या कारवाईतून ते पुढे आले आहे.
हे सर्व सांगायचे कारण की, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे नुकतेच एक प्रकरण समोर आले. १९ वर्षाच्या अयान अहमद याने जे दिवे लावले आहेत, ते फुंकर मारूनही दिसत नाहीत. आयुष्य घडविण्याच्या वयात या पठ्ठ्याला मुलींना आपल्या जाळ्यात अडकविण्याचा छंद जडला. खर्चासाठी पैसे जुळविण्याचे फंडेही त्याने आत्मसात केले. यश मिळत गेल्यावर त्याने ‘मी इतक्या मुली पटविल्या, तू किती पटविणार’, असे सांगत इतरांना सोबत घेत स्पर्धाच सुरू केली. आचरण व स्वभावानुसारच मित्र मिळत असतात. अयानला त्याच्यासारखेच मित्र मिळाले. फक्त मुलींना जाळ्यात अडकवून गप्पाटप्पा करेपर्यंत मर्यादि राहिला नाही. त्यांचे लैंगिक शोषण त्याने केले. पैशांचा वाद झाल्याने उजेर नावाच्या मित्रानेच त्याचा भंडाफोड केला. याचा अर्थ उजेर काही धुतल्या तांदळासारखा नाही. अयानचा तो स्पर्धकच होता. अयानने तर आठ मुलींसोबत गैरवर्तन केले, हे अधिकृतपणे पोलिसांकडे नोंदविले गेले आहे. सर्व मुली समोर अयानला कायमची अद्दल घडविणे पोलिसांसाठी सहज शक्य आहे. पण, आतापर्यंत त्यातल्या एकीनेच तक्रार दिली, हे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे. मुलींची संख्या कमी-अधिक असू शकते पण अशा घटना सातत्याने सगळीकडे समोर येत आहेत. अनेक घटना ठरवून केलेल्या असतात तर काही वादावादीतून चव्हाट्यावर येतात. ज्या पुढेच येत नाही, त्याची पण संख्या मोठी आहे. अगदी सहजतेने मुली अशा भामट्यांच्या जाळ्यात अडकतात, हेही आश्चर्यच आहे.
 
 
Sanskarit yuva piḍhi  सर्वच नाही पण ज्या मुला-मुलींमध्ये असे समाजाला लाजविणारे बदल झाले आहेत किंवा होत आहेत, याचा चिकित्सकपणे अभ्यास होणे आता गरजेचे आहे. सांगायचा मुद्दा इतकाच की, मुला व मुलींना बालपणीच योग्य संस्कार दिले तरच ते नियंत्रणात राहतात. एका वयापर्यंत मुलांच्या देहबोलीवर व बाहेरच्या घडामोडींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे फारच आवश्यक आहे. ज्यांना जाणीव आहे ते बरोबर दक्षता बाळगतात. पैशाने बिनधास्तपणा आलेले व प्रेमात आंधळे झालेल्या पालकांना मुलांचे अवगुण दिसत नसल्याने त्यांच्यावर पुढे पश्चात्तापाची वेळ येते. वयात येणार्‍या मुला व मुलींनी काय करावे यापेक्षा काय करू नये हे त्यांना शिकविण्याची वेळ आली आहे. चांगले काय आणि वाईट काय यातला फरकही त्यांना समजून सांगायला हवा. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, हे पालकांनी समजून घेतले पाहिजे. पटकन सगळे काही व्यवस्थित होईल, असे नाही. पण, प्रामाणिक प्रयत्नातून ते शक्य आहे. कृपया पाल्यांना वेळ द्या, त्यांना कुटुंबासाठी व समाजासाठी संस्कारित करा, हीच 
 
९४२०७२१२२५