आता शाळा सकाळी सात ते दहा याच वेळात!

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
भंडारा,
school-hours-changed : वाढते तापमान लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी सात ते दहा या वेळात भरविण्यात याव्या, असे आदेश जिल्हाधिकारी भंडारा यांनी काढले आहेत. या निर्णयामुळे भर उन्हात शाळेतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
 
 
BHANDARA
 
 
भंडारा जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या आरोग्याचा विचार करता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी सर्व अंगणवाडी, माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक, इंग्रजी माध्यमांच्या शाळा सकाळी सात ते दहा या वेळातच भरविण्याचे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे दुपारी तीन वाजेपर्यंत शाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
 
सातत्याने वाढणारे तापमान आणि विद्यार्थ्यांची उन्हामुळे होणारी अडचण लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय पालकांनाही सुखावणारा आहे.