महिला पाेलिस कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार

- आराेपी पतीविरुद्ध नंदनवन पाेलिसात गुन्हा दाखल

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
sexual-assault-on-female-police-officer : एका महिला पाेलिस कर्मचाèयासाेबत तिच्या पतीनेच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नंदनवन पाेलिस ठाण्यात आराेपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
k
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पाेलिस दलात कार्यरत असून तिचा पती खासगी क्षेत्रात काम करताे. काैटुंबिक कलहामुळे हे दाम्पत्य गेल्या काही काळापासून वेगळे राहत असून त्यांच्यात न्यायालयात घटस्ाेटाचा खटला सुरू आहे. या जाेडप्याची दाेन मुले सध्या आराेपी वडिलांकडेच राहतात. 19 एप्रिलला पीडित महिला आपल्या मुलांना भेटण्यासाठी पतीच्या घरी गेली हाेती. मुले घरी नसल्याची संधी साधून पतीने तिला अपार्टमेंटच्या गच्चीवर नेले. तिथे तिला गुंगीकारक औषध मिसळलेले शीतपेय देण्यात आले. ते प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेत असताना पतीने तिच्यासाेबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने नंदनवन पाेलिस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला. तक्रारीचे गांभीर्य ओळखून पाेलिसांनी आराेपी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नाेंदवला आहे.