वाशीम,
world-earth-day : स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूल येथे निसर्ग इको लब व राष्ट्रीय हरित सेना व सामाजिक वनीकरण विभाग वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी वर्षभर गोळा केलेल्या (बियांचे) सीड बँकेच्या प्रदर्शनीचे शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मीना उबगडे होत्या.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून सिड बँकेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सदर सिड बँक प्रदर्शना अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध रंग, आकार, वजन, उपयुक्तता व आरोग्यावर होणारे त्यांचे परिणाम व पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता याची माहिती दिली. सिड बँकेच्या प्रदर्शनाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत जोशी, प्राचार्य मीना उबगडे, विभागीय वन अधिकारी अशोक पर्हाड, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र कातखेडे, वनपाल बेले, वनरक्षक भगवान वानखेडे, अनिल लेमले, संतोष जुमडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी शिक्षिका भारती गटलेवार, तसेच राष्ट्रीय हरित सेनेचे चिमुकल्यांनी अथक परिश्रम घेतले.