श्रीपरशुराम जन्मोत्सवानिमित्त वणीत भव्य दुचाकी रॅली

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
वणी,
two-wheeler-rally : भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त शहरात अखिल ब्राह्मण समाजातर्फे उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जैताई मंदिरातून शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध व भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाèया मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाèया व्यक्तींना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला राजू उंबरकर, मुन्ना महाराज तुगनायत, डॉ. स्वानंद पुंड, मूलचंद जोशी, सुभाष तिवारी, अरुण कावडकर, अमित उपाध्ये, मिलिंद आमलेकर, श्रीवल्लभ सरमोकदम, अ‍ॅड. प्रवीण पाठक, महेश पांडे, अजय चन्ने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुरेश देशकर यांनी, तर संकेत अलोणे यांनी आभार मानले.
 
 

y22Apr-Wani-Rally