आ. सुमित वानखेडे यांची यवतमाळ भाजप जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
आर्वी, 
sumit-wankhede : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने संघटनात्मक बांधणीसाठी जिल्हा प्रभारी म्हणून नियुत्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आर्वीचे आ. सुमित वानखेडे यांची यवतमाळ जिल्हा प्रभारी म्हणून नियुती करण्यात आली आहे.
 
 
sumit
 
 
 
आ. वानखेडे यांनी नेतृत्वशैलीने आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या थेट संवादामुळे संघटनात्मक पातळीवर नेहमीच आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी केरळ विधानसभा निवडणुकीत प्रवासी प्रभारी म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिलेली जबाबदारी पार पाडली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक बूथपर्यंत १०० टके पोहोचवण्यामध्ये त्यांच्या सूक्ष्म नियोजनाचा मोठा वाटा राहिला आहे. मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासोबतच, शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ’स्मार्ट’ यंत्रणा उभी केली आहे. नव्या नेतृत्वाला संधी देणे आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्याला सक्षम करणे, यावर आ. वानखेडे यांचा भर राहिला आहे. आगामी काळात यवतमाळ जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक बळकट होईल आणि पक्षाचा विस्तार नवीन उंचीवर पोहोचेल, असा विश्वास आ. वानखेडे यांनी नियुतीनंतर व्यत केला.