स्वच्छ भारतचे कंत्राटी कर्मचारी वेतनाविना

4 महिन्यांपासून प्रतीक्षा, कुटुंबियांवर उपासमारीची वेळ

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
swachh-bharats-contract-employees : जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाèयांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. शासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाèयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 

k 
 
 
 
राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या पाणी व च स्वच्छता विभागात कार्यरत तब्बल 1200 कंत्राटी कर्मचारी गेल्या 4 महिन्यांपासून वेतनाविना संघर्ष करत आहेत. प्रत्येक जिल्हा परिषदेत 18 ते 19 तर प्रत्येक तालुक्यात 2 कर्मचारी कार्यरत आहेत. मारेगाव तालुक्यात 3 कर्मचारी कार्यरत आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता या अत्यावश्यक सेवांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाèया या कर्मचाèयांना मात्र मूलभूत हक्क असलेल्या वेतनासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे.
 
 
जलजीवन अभियानातील कर्मचाèयांचे डिसेंबर ते मार्चपर्यंतचे वेतन झालेले नाही. तसेच स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. वेतन प्रलंबित असल्याने या कर्मचाèयांच्या कर्ज व विम्याचे हप्ते थांबले आहेत. काम करूनही वेतन मिळत नसल्याने या कंत्राटी कर्मचाèयांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने समस्या गंभीर बनली आहे.