अनिल कांबळे
नागपूर,
chili-truck-overturns : वर्धा महामार्गावरील विमानतळाला लागून असलेल्या चिंचभूवन परिसरातील भारत पेट्राेलियम पेट्राेल पंपजवळ बुधवारी दुपारी शाॅर्टसर्किटमुळे मिरची वाहतूक करणाèया ट्रकला अचानक आग लागली. सुदैवाने तातडीने आग विझवण्यात आल्याने माेठी दुर्घटना टळली. रस्त्यावर मिरची पसरल्याने रस्त्यावरील वाहतूक खाेळंबली. जवळपास दाेन तास रस्त्यावरील वाहतूक काेंडी ुटली नाही, हे विशेष.
चिंचभवन परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक काेंडी नेहमीच असते. मेट्राे विस्तारिकणाचे कामे दाेन्ही बाजूंना सुरू असल्याने हा मार्ग निमुळता झाला आहे. त्यात मिरचीची वाहतूक करणारा ट्रक आग लागल्यानंतर उलटल्याने ट्रकमधील मिरची वर्धा मार्गावर पसरली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे माेठा अनर्थ टळला. मात्र, आगीच्या घटनेदरम्यान ट्रकमधील मिरची रस्त्यावर पसरल्याने परिसरात काही काळ गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले. दाेन तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.