हेल्मेट वापरा, जीव वाचवा..! उमरखेडमध्ये वाढत्या अपघातांवर गंभीर चिंता

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
use-helmet : उपविभागात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले असून, विशेषतः तरुणांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलिस निरीक्षक अमोल गुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये एकूण 36 प्राणघातक अपघात झाले होते. तर 20 एप्रिल 2026 पर्यंतच 13 अपघातांची नोंद झाली आहे.
 
 
helmet
 
 
 
या एकूण 49 अपघातांपैकी तब्बल 95 टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे मोटारसायकलस्वारांचे असून, धक्कादायक बाब म्हणजे हे सर्वजण विनाहेल्मेट होते.
 
 
तज्ञांच्या अंदाजानुसार, या सर्वांनी हेल्मेटचा वापर केला असता तर 90 टक्क्यांहून जास्त लोकांचे प्राण वाचू शकले असते. यामध्ये आणखी एक गंभीर बाब म्हणजे, अपघातांतील 70 ते 75 टक्के मृत्यू हे 30 वर्षांखालील तरुणांचे आहेत, ज्यामुळे कुटुंबांवर मोठा आघात होत आहे.
 
 
वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, हेल्मेटचा वापर हा केवळ नियम नसून जीवनरक्षक सवय आहे. वेगमर्यादा पाळा आणि सुरक्षित वाहन चालवा, स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी जबाबदारीने वागा, या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सामूहिक जनजागृती अत्यंत आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.