विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक : वर्षा कोल्हे

(विद्यापीठात राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम)

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
गडचिरोली, 
varsha-kolhe : सोशल मीडिया, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल माध्यमांमुळे जनसंपर्काची व्याप्ती कशी वाढली आहे, तसेच संस्थेची प्रतिमा घडविण्यात पीआरची भूमिका किती महत्त्वाची ठरते, याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्टीकरण केले. प्रभावी संवाद कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्‍वास आणि योग्य माहिती सादर करण्याची पद्धत या बाबी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेच्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डिजीटल स्किल्स आत्मसात करून स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांनी म्हटले.
 
 
K
 
 
गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त ‘ऊळसळींरश्र झठ, र्उेााीपळलरींळेप डज्ञळश्रश्री । उरीशशी र्जििेीीींपळींळशी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
 
 
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्‍न विचारले. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रामुळे विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान झाले आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. सरफराज अंसारी, सहा. प्रा. रोहित कांबळे, सहाय्यक प्रा. नीळकंठ नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन रोहित कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक प्रा. मनोज बिरहारी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
 
 
एकूणच, राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त आयोजित या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना जनसंपर्क क्षेत्रातील आधुनिक प्रवाह, आवश्यक कौशल्ये आणि करिअरच्या संधींबाबत सखोल माहिती मिळाली. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरला असून त्यांच्या करिअर घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरला.