पाण्यासाठी वडकीत महिलांचा ‘घागरमोर्चा’

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
womens-ghagar-morcha : तालुक्यातील वडकी ग्रामपंचायत हद्दीतील फुकटनगरात आठ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे संतप्त महिलांनी मंगळवार, 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढला. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.
 

y22Apr-Ghagar 
 
 
उन्हाचा पारा 44 अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचतात वडकीकरांचा पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र झाला असून. त्यामुळे वडकी येथील फुकटनगर परिसरात बèयाच महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महिलांनी हा घागर मोर्चा काढला.
 
 
पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा यावेळी महिलांनी दिला. पाण्याअभावी आम्हाला भटकावे लागते सात ते आठ दिवसांत देखील पाणी येत नाही. त्यामुळे महिलांनी ग्रामविकास अधिकारी पंढरी खडसे यांच्यापुढे पाण्याची समस्या मांडली.
 
 
तत्काळ पाण्याची व्यवस्था केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केला. त्यानंतर ग्रामविकास अधिकाèयांनी पाण्याची समस्या लक्षात घेऊन तत्काळ पर्यायी व्यवस्था करून देतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर महिलांनी मोर्चा मागे घेतला. यावेळी फुकटनगरातील असंख्य महिला उपस्थित होत्या.