तरुणीने ‘क्रिप्टाे ट्रेडिंग’च्या नावाने वकिलाला घातला गडा

- सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले वकील

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
crypto-trading : फेसबुकवर एका तरुणीशी ओळख झाल्यानंतर तिने चॅटिंग करीत एका वकिलाला मैत्रिच्या जाळ्यात अडकवले. तिने ‘क्रिप्टाे ट्रेडिंग’च्या आमिषाने पैसे गुंतवण्यास प्राेत्साहित केले. त्या वकिलाची सायबर गुन्हेगार तरुणीने 1 लाख 19 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बजाजनगर पाेलिसांनी एका अज्ञात महिला व पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

 jk 
 
संबंधित वरिष्ठ वकील 28 जानेवारी 2026 राेजी ेसबुक वापरत असताना संस्कृती राजपूत या नावाने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली. पुढील काही दिवस दाेघांमध्ये साेशल मीडियावर संवाद सुरू झाला. त्यानंतर संबंधित महिलेने वकिलाशी व्हाॅट्सअ‍ॅपवर चॅटिंग सुरू केली. तिने वकिलाला ती ट्रेडिंगच्या माध्यमातून दिवसाला 50 हजार ते 1 लाख रुपये कमवत असल्याची बतावणी केली. तिने त्यांनादेखील गुंतवणूक करण्याचा आग्रह केला. तिने वकिलाला ‘ट्रस्ट वाॅलेट’ नावाचे अ‍ॅप डाउनलाेड करण्यास सांगितले आणि क्रिप्टाे ट्रेडिंगद्वारे अल्पावधीत माेठा ना मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
 
 
महिलेने पुढे अधिनेश मेहता नावाच्या व्यक्तीचा माेबाइल क्रमांक देत त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. या व्यक्तीने िफर्यादीला एका वेबसाइटवर नाेंदणी करून विविध व्यवहार करण्याचे मार्गदर्शन केले. सुरुवातीला विश्वास बसावा म्हणून कमी रक्कम गुंतवून ना मिळाल्याचे दाखवण्यात आले. िफर्यादीने 20 हजार रुपये गुंतवले असता काही रक्कम परत मिळाल्याने त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला. यानंतर आराेपींनी टप्प्याटप्प्याने अधिक पैसे गुंतवण्यास भाग पाडले. वेगवेगळ्या यूपीआय आयडींवर पैसे पाठविण्यास सांगण्यात आले. वकिलाने 1.19 लाख रुपये पाठविले. प्रत्येक वेळी माेठा ना मिळाल्याचे दाखवत आणखी गुंतवणुकीसाठी दबाव टाकण्यात आला. शेवटी 4.94 लाख रुपये परत मिळणार असल्याचे सांगून आणखी 1.56 लाख रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा मात्र वकिलाला संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वकिलाने सायबर सेलमध्ये तक्रार दिली.त्यानंतर बजाजनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.