गडचिरोली,
yuva-shakti-jagar-yatra : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखालील युवा जागर यात्रेला आज मुंबईतून अत्यंत उत्साहात सुरुवात झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गडचिरोली जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी मुंबईत विशेष उपस्थिती दर्शवली.
या यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी गडचिरोली जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी मुंबईत दाखल झाले होते. यामध्ये जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, जिल्हा महामंत्री अक्षय हेमके, जिल्हा महामंत्री पवन रामगिरकर, सोशल मीडिया प्रमुख चेतन कोलते या सर्वांनी यात्रेच्या नियोजनात आणि शुभारंभ सोहळ्यात सक्रिय सहभाग नोंदवत गडचिरोली जिल्ह्यातील युवकांचा आवाज बुलंद केला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवा शक्तीला मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘युवा शक्ती जागर यात्राट ही महाराष्ट्रातील तरुणांच्या आशा-आकांक्षेला नवा प्लॅटफॉर्म देणारी ठरेल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही युवा मोर्चाच्या कामाचे कौतुक करत यात्रेला शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली सोशल मीडिया प्रमुख चेतन कोलते यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेचा डिजिटल प्रचार जिल्हाभर प्रभावीपणे राबवला जात आहे. तर महामंत्री आकाश सातपुते, अक्षय हेमके आणि पवन रामगिरकर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून युवकांना या यात्रेशी जोडण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे.
मुंबईतून निघालेली ही यात्रा लवकरच गडचिरोली जिल्ह्यात पोहोचणार असून, जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजनांचा जागर करत ही यात्रा गडचिरोलीच्या कानाकोपर्यात पोहोचेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.