बारामतीसह तीन राज्यांत पोटनिवडणुकांसाठी मतदान सुरू

सुनेत्रा पवार यांची प्रतिष्ठा पणाला

    दिनांक :23-Apr-2026
Total Views |
महाराष्ट्र,
Sunetra Pawar तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांतील काही विधानसभा जागांसाठी आज पोटनिवडणुकांचे मतदान सुरू झाले आहे. तामिळनाडूमधील २३४ आणि पश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा जागांसाठी निवडणुका होत असून, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी तसेच गुजरातमधील उमरेठ या तीन रिक्त जागांसाठीही मतदान प्रक्रिया सुरू आहे. विद्यमान आमदारांच्या निधनामुळे या जागांवर पोटनिवडणुका घेणे आवश्यक झाले आहे.

Baramati by-election 2026, Sunetra Pawar, 
 
महाराष्ट्रातील बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवार सुनेत्रा पवार या या निवडणुकीत रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात २३ अपक्ष उमेदवार उभे असले तरी, राजकीय निरीक्षकांच्या मते या लढतीत सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे.
आज सकाळी मतदानासाठी Sunetra Pawar  जाण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मारकाला भेट देत आदरांजली वाहिली. त्यांच्या निधनानंतर काही दिवसांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली आहे. आता विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवून आमदार होण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या सन्मानार्थ प्रमुख विरोधी पक्षांनी उमेदवार न उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत थेट राजकीय संघर्ष नसला तरी अपक्ष उमेदवारांकडून सुनेत्रा पवार यांना आव्हान दिले जात आहे.
 
 
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असून, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे या पोटनिवडणुकीचा राज्य सरकारच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, उपमुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी सुनेत्रा पवार यांना आमदार होणे आवश्यक असल्याने बारामतीतील ही निवडणूक त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.एकूणच, विविध राज्यांतील या पोटनिवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले असून, विशेषतः बारामतीतील निकालाकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.