‘भूत बंगला’ने ‘धुरंधर 2’ला केले 'ओव्हरटेक'

    दिनांक :23-Apr-2026
Total Views |
मुंबई
Bhoot Bangla बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा बहुचर्चित भूत बंगला हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. सहा दिवसांतच चित्रपटाने उल्लेखनीय कमाई करत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवला असून, अक्षय कुमारच्या अलीकडील चित्रपटांतील मंदीला या चित्रपटाने ब्रेक दिल्याची चर्चा रंगली आहे.
 

Bhoot Bangla box office collection 
प्रदर्शनाच्या पहिल्याच वीकेंडमध्ये ‘भूत बंगला’ने ५० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला. इतकेच नव्हे तर अवघ्या चार दिवसांत चित्रपटाने जागतिक स्तरावर १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला. त्यामुळे चित्रपटाच्या यशाची नोंद उद्योगात ठळकपणे घेतली जात आहे.चित्रपटाच्या दैनंदिन कमाईकडे पाहिल्यास, पहिल्या दिवशी १२.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी १९ कोटी आणि तिसऱ्या दिवशी २३ कोटी रुपयांची कमाई झाली. त्यानंतर चौथ्या दिवशी ६.७५ कोटी आणि पाचव्या दिवशी ८ कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात आला. ‘सॅकनिल्क’च्या अहवालानुसार, सहाव्या दिवशी दुपारपर्यंत चित्रपटाने ३.७४ कोटी रुपयांची कमाई केली असून, दिवसाअखेर ही आकडेवारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूण देशांतर्गत कमाई सुमारे ७६.४९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर जागतिक कमाई ११८ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून रणवीर सिंह यांच्या धुरंधर : द रिव्हेंज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा होता. मात्र ‘भूत बंगला’च्या यशामुळे त्या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे.विशेष म्हणजे, ‘भूत बंगला’ने पाचव्या दिवशी जॉली एलएलबी 3 पेक्षाही अधिक कमाई केली. मात्र अजूनही तो हाऊसफुल 5 च्या कमाईपासून काहीसा मागे आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून, अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची ही जोडी पुन्हा एकदा यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. याआधी या जोडीने ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’, ‘भागम भाग’ यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत.सुमारे १२० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या हॉरर-कॉमेडी चित्रपटात अक्षय कुमारसोबत परेश रावल, राजपाल यादव, तब्बू, जिशू सेनगुप्ता आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.चित्रपटाची सध्याची कमाई आणि प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता, लवकरच ‘भूत बंगला’ आपले संपूर्ण बजेट वसूल करेल आणि त्यानंतर नफ्याच्या दिशेने वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.