कोपेनहेगन
Denmark train collision डेनमार्कची राजधानी कोपेनहेगनच्या उत्तरेकडील भागात गुरुवारी पहाटे दोन प्रवासी ट्रेनमध्ये झालेल्या भीषण मोठा अपघात घडला आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. डेनमार्क पोलिसांनी या घटनेला अत्यंत गंभीर स्वरूपाचा अपघात असे संबोधले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात कोपेनहेगनच्या उत्तरेकडील रेल्वे मार्गावर झाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घटनेनंतर लगेचच आपत्कालीन सेवा, अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना बाहेर काढण्याचे आणि मदतकार्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या अपघातात किती प्रवासी जखमी झाले किंवा किती हानी झाली आहे, याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.डेनमार्क पोलिसांनी नागरिकांना अपघातस्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले असून रेल्वे वाहतुकीवरही तात्पुरता परिणाम झाला आहे. तपास यंत्रणा अपघाताच्या कारणांचा शोध घेत असून पुढील माहिती लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.या भीषण अपघातामुळे संपूर्ण डेनमार्कमध्ये चिंता व्यक्त केली जात असून रेल्वे सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.