VIDEO: मोठा स्फोट! कंपनीत भीषण आग

    दिनांक :23-Apr-2026
Total Views |
भरूच,
fire-after-blast-in-company : भरूच जिल्ह्यातील झागडिया येथील जीआयडीसी परिसरात मेट्रोपॉलिटन एक्झेम नावाच्या कंपनीत मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आल्याने आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरली. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी बचाव व मदतकार्य सुरू केले.
 
 
blast
 
प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत काही कामगार जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग इतकी भीषण होती की धुराचे लोट दूरवर दिसत होते. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू असून, स्फोटाचे कारण अद्याप अज्ञात आहे. पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास करत आहेत.