अलर्ट जारी! उष्णतेचा कहर... ईशान्येकडे मुसळधार पावसाचा इशारा

    दिनांक :23-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
heatwave देशातील हवामान सध्या दोन टोकांच्या स्थितीत आहे. एकीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट उसळली आहे, तर दुसरीकडे ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज देशातील १२ राज्यांसाठी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
 

heatwave  
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून, काही भागांत ताशी ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.याउलट दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस ही परिस्थिती कायम राहील, असा इशाराही विभागाने दिला आहे.
 
 
कशी स्थिती राहील
पंजाब, हरियाणा, चंदीगड heatwave  आणि दिल्ली परिसरात पुढील दोन दिवस तीव्र उन्हाचा तडाखा बसणार आहे. उत्तर प्रदेशात पुढील चार दिवस, राजस्थान आणि मध्य प्रदेशात पुढील तीन दिवस, तसेच विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिल्लीसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये तापमान सातत्याने वाढत असून, आज कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमानही २३ ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असून, उकाड्यापासून कोणताही दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. २४ एप्रिल रोजी तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, २५ एप्रिललाही उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे.दरम्यान, ईशान्य भारतात हवामानाचा वेगळाच चित्र पाहायला मिळत आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये २३ ते २४ एप्रिल दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. आसाम आणि मेघालयमध्ये २३ ते २६ एप्रिल दरम्यान पावसासह वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.पूर्व भारतातील उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड आणि ओडिशा या भागांतही मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ७० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
 
 
दक्षिण भारतातही काही heatwave  प्रमाणात पावसाची शक्यता आहे. केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २३ ते २५ एप्रिल दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.एकूणच, देशभरात सध्या हवामानाचे तीव्र आणि विरोधाभासी स्वरूप दिसून येत असून, नागरिकांनी स्थानिक हवामान अंदाजानुसार आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.