एका क्षणात भारतात सर्वकाही ठप्प होईल, जगावर मोठे संकट येणार

    दिनांक :23-Apr-2026
Total Views |
इराण
Iran US tensions इराण आणि अमेरिकेतील तणाव अत्यंत गंभीर वळणावर पोहोचल्याचे संकेत मिळत असून, या संघर्षाचा फटका आता केवळ लष्करी किंवा ऊर्जा क्षेत्रापुरता मर्यादित न राहता जागतिक डिजिटल पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कडून फारस खाडीतील समुद्राखालील इंटरनेट केबल्सचा तपशील आणि नकाशे प्रसिद्ध करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे.
 

Iran US tensions, Persian Gulf internet cables 
या नकाशांमध्ये फारस खाडीच्या तळाशी असलेल्या महत्त्वाच्या सबमरीन इंटरनेट केबल नेटवर्कचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. हीच केबल्स मध्य पूर्वेतील अनेक देशांना तसेच युरोप, आशिया आणि आफ्रिकेला जोडणाऱ्या जागतिक इंटरनेट प्रणालीचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे या पायाभूत सुविधांवर कोणताही हल्ला झाल्यास त्याचे परिणाम केवळ प्रादेशिक नसून जागतिक पातळीवर जाणवू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.फारस खाडी हा डिजिटल दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. येथून जाणाऱ्या समुद्री केबल्सद्वारे मोठ्या प्रमाणात इंटरनेट डेटा ट्रान्सफर होतो. या केबल्सना धोका निर्माण झाल्यास बँकिंग व्यवहार, क्लाउड सेवा, डिजिटल पेमेंट प्रणाली तसेच दैनंदिन इंटरनेट सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतासारख्या देशांवरही याचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो, कारण भारताचा मोठा डिजिटल डेटा ट्रॅफिक या आंतरराष्ट्रीय मार्गांवर अवलंबून आहे.
सध्याच्या घडामोडींमध्ये Iran US tensions अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. होर्मुज खाडी परिसरात तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या हालचालींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर IRGC कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशांमुळे संभाव्य डिजिटल धोक्यांच्या चर्चांना उधाण आले आहे.तज्ज्ञांच्या मते, समुद्राखालील इंटरनेट केबल्स ही आधुनिक जगाची अदृश्य पण अत्यंत महत्त्वाची जीवनरेषा आहे. या व्यवस्थेला लक्ष्य केल्यास केवळ संचार यंत्रणा नाही तर जागतिक आर्थिक व्यवहारांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी हा विषय केवळ तर्क आणि संभाव्य धोके यापुरता मर्यादित असला तरी, आंतरराष्ट्रीय पातळीवर याकडे अत्यंत गंभीरतेने पाहिले जात आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत आणि स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला याबाबत निश्चित निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असेही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.