मुंबई
Raja Shivaji मराठमोळ्या रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राजा शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉच झाला. १० वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर राजा शिवाजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असल्याने रिेतेश-जेनेलिया ट्रेलर लॉंचवेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. रितेशला शिवाजीच्या भूमिकेत बघून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पण ट्रेलरमध्ये रितेशचा मुलगा राहील देशमुखला भूमिकेत बघून सगळे अवाक् झाले
सोमवारी राजा शिवाजी Raja Shivaji चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न झाला. यावेळी बालशिवाजीच्या भूमिकेत १० वर्षाच्या राहील देशमुखने स्वराज्यबद्दल केलेले विधान त्याच्यातील आत्मविश्वासाची चुणूक दाखवून गेले. त्यानंतर अनेकांनी राहीलवर कौतुकाचा वर्षाव केला. अवघ्या १० वर्षाच्या राहीलचा आत्मविश्वास कमालीचा असून तो ही भविष्यात वडीलांच्या पावलावर पाऊल टाकेल असा कयास लावला जात आहे. रितेश-जेनेलियाला दोन मुलं असून रियान आणि राहील अशी त्यांची नावे आहेत.
राजा शिवाजी चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य, शौर्यावरील कथेवर आधारित आहे. या चित्रपटात रितेश- जेनेलिया देशमुख यांच्यासह महेश मांजरेकर, फरदीन खान, विद्या बालन, अभिषेक बच्चन, संजय दत्त, सचिन खेडेकर, भाग्यश्री, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते अशा मातब्बर कलाकारांची मंदियाळी आहे. १ मे २०२६ रोजी राजा शिवाजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.