शिवशक्ती गुरुकुलमचे उन्हाळी शिबिर २०२६

    दिनांक :23-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Shivshakti Gurukulam आजच्या काळात स्वरक्षणासोबतच आपल्या गौरवशाली परंपरेची ओळख असणे गरजेचे बनले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या शौर्यपरंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी शिवशक्ती गुरुकुलम तर्फे ‘उन्हाळी शिबिर २०२६’ आयोजित करण्यात आले आहे.
 
 
lathi
 
 
हे शिबिर ३ मे ते १८ मे दरम्यान सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अभ्यंकर नगर संघ मैदान येथे होणार आहेShivshakti Gurukulam . या शिबिरात भारतीय पारंपरिक युद्धकला जसे लाठी-काठी, तलवारबाजी, भाला आणि धनुर्विद्या यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.८ ते ८० वर्षे वयोगटातील इच्छुकांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
सौजन्य:अभय चोरघडे,संपर्क मित्र