नागपूर,
Technical Workers' Union “रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा” या भावनेतून तांत्रिक कामगार युनियन (५०५९) संचालित ॲम्बुलन्स सेवेसाठी नव्या रुग्णवाहिकेचा ग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते करण्यात आले.या रुग्णवाहिकेची संकल्पना साकारण्यात विक्की कावळे, मंगेश चिमोटे आणि निलेश चक्रपाणी यांचा विशेष सहभाग राहिला. कार्यक्रमात माधव चकोर, सौरभ गणोरकर, नकुल होले, रितीक वानखेडे, स्वप्निल आमझिरे, कुणाल आमझिरे व गौरव सावरकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर ग्रामीणचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, आयुष ब्लड सेंटर अँड कॉम्पोनंट लॅबचे संचालक संजय बारागवने Technical Workers' Union “ तसेच पंचायत समिती नरखेडचे प्रकाश देशमुख उपस्थित होते. तसेच तांत्रिक कामगार युनियनचे माजी प्रादेशिक सचिव नागपूर मोहनदास चोरे, साहिल कडक व उज्वल काजने यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सौजन्य :देवराव प्रधान,संपर्क मित्र