मुंबई
Tumbadchi Manjula झी स्टुडिओज निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. टीझरमधील गावकऱ्यांची हटके झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या गावात नेमके काय वेगळे आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता चित्रपटातील ‘असं वेगळं गाव’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्याचं वैशिष्ट्ये म्हणजे शास्त्रीय आणि सुगम संगीतातील सुप्रसिद्ध नाव राहुल देशपांडे आणि गोड गळ्याची गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरांतून या गावाचं दर्शन होणार आहे. या दोघांच्या आवाजातील भावपूर्णता आणि सहजता गाण्याला एक वेगळीच उंची देते. या गाण्याच्या निमित्ताने ही दोन नावे प्रथमच एकत्र आली असून त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दलची उत्कंठा वाढली आहे.
गाण्याबद्दल राहुल देशपांडे Tumbadchi Manjula म्हणतात, ” ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटामधील हे एक अतिशय फ्रेश आणि वेगळ्या धाटणीचं गाणं गाण्याची संधी मला मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. या गाण्याचं संगीत अत्यंत आधुनिक असूनही त्यात गावाकडचा गंध सुंदरपणे जपला आहे, ही त्याची खासियत आहे. याचे शब्द आणि चाल ही आजच्या काळाशी सुसंगत अशीच असून मला खात्री आहे की, हे गाणं प्रेक्षकांना नक्की आवडेल.”