कोण बसणार सत्तेच्या सिंहासनावर? सकाळी ९ वाजेपर्यंत सुमारे १८ टक्के मतदानाची नोंद

तामिळनाडूतील २३४ जागांवर मतदान

    दिनांक :23-Apr-2026
Total Views |
पश्चिम बंगाल,
west bengal tamil nadu election पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. दोन्ही राज्यांतील मतदारांमध्ये लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून सकाळच्या सत्रात काही तांत्रिक अडचणी वगळता मतदान प्रक्रिया बहुतांश ठिकाणी शांततेत पार पडत असल्याचे चित्र आहे.
 

west bengal tamil nadu election-2026-voting-turnout-live-updates 
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १५२ विधानसभा जागांसाठी होत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जात आहे. या टप्प्यात एकूण १,४७८ उमेदवार रिंगणात असून सुमारे ४.४ कोटीहून अधिक मतदार आपला हक्क बजावत आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये १८.७६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत असून तेथे सकाळी ९ वाजेपर्यंत १७.६९ टक्के मतदान नोंदवले गेले आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये west bengal tamil nadu election  उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिल्यामुळे दुपारच्या वेळेत मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मतदारांनी सकाळी व संध्याकाळच्या सत्रातच मतदान केंद्रांवर गर्दी करण्यास प्राधान्य दिले आहे.दरम्यान, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या असून त्या तातडीने दुरुस्त करून मतदान पुन्हा सुरू करण्यात आले. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी मतदान प्रक्रियेदरम्यान आपल्या मतदारसंघातच उपस्थित राहावे आणि शांतता व सुव्यवस्था राखावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेससमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान असून भारतीय जनता पक्षाने राज्यात बदल घडवून आणण्याचा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी या निवडणुकीत परिवर्तन होईल, असा विश्वास व्यक्त केला असून निवडणूक प्रक्रियेत काही ठिकाणी अनियमितता होत असल्याचा आरोपही केला आहे.
तामिळनाडूमध्येही west bengal tamil nadu election  सत्ताधारी डीएमके आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्ता टिकवण्यासाठी कठीण आव्हानांचा सामना करावा लागेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मतदानाचा उत्साह वाढलेला दिसून आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी कराईकुडी येथे मतदानाचा हक्क बजावला. तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख आणि अभिनेता विजय यांनीही मतदान केले. विविध पक्षांच्या उमेदवारांनी सकाळपासूनच मतदान प्रक्रियेत सहभाग घेत लोकशाहीचा उत्सव साजरा केला.दरम्यान, काही ठिकाणी ईव्हीएम बिघाड वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असून निवडणूक आयोगाने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. मतदानाचा दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी होणार असून मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.