भंडारा:
Bus depot accident आगारात कामानिमित्त गेलेल्या एका त्याच्या तीन वर्षीय चिमुकल्याचा बस खाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना आज 24 रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर नंतर प्रचंड जनसमुदाय आगार परिसरात गोळा झाला असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
भंडारा शहरातील कुंभारटोली भागातील रोहित हा आरओ प्लांटमध्ये पाणी पुरवठ्याचे काम करत होता. तो आपल्या तीन वर्षीय मुलाला दुचाकीवर बसवून एसटी आगारात आला. आगार परिसरात त्याने बस रॅम्पच्या मागे दुचाकी उभी केली होती, त्यावर मुलगा बसलेला होता. त्यानंतर रोहित काही कामानिमित्त थोड्या अंतरावर गेला.
Bus depot accident याच दरम्यान रॅम्पवर उभ्या असलेल्या एसटी बसच्या चालकाने बस मागे घेतली. बस रिव्हर्स घेतल्याने दुचाकी आणि त्यावर बसलेला मुलगा बसच्या चाकाखाली आला. मुलगा धोक्यात आल्याचे पाहून रोहित त्याला वाचवण्यासाठी धावला, मात्र तोही बसच्या मागील चाकाखाली सापडला. यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भंडारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान एसटी डेपो प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवून नागरिकांना डेपोमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला. पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.