विश्वासघात करणार्‍यांना महिला माफ करणार नाही

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
अल्का आत्राम यांचा इशारा

चंद्रपूर, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 व 17 एप्रिल रोजी महिला सक्षमीकरणाचा सन्मान करणारे 'Nari Shakti Vandana Act' ‘नारी शक्ती वंदन अधिनयम’ संसदेत चर्चेसाठी आणले होते. मात्र, विरोध पक्षांनी हे विधेयक नामंजूर करून देशातील 50 टक्के लोकसंख्येत असलेल्या महिलांच्या स्वप्नांचा चुराडा केला. विरोधकांच्या या निंदनीय कार्यासाठी महिला त्यांना कधीच माफ करणार नाही, असे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम म्हणाल्या.
 
 
aatram
 
भाजपा महिला मोर्चा जिल्हा चंद्रपूरतर्फे शुक्रवार, 24 एप्रिल रोजी येथे आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. आत्राम म्हणाल्या, 2023 मध्ये जेव्हा 'Nari Shakti Vandana Act'  नारी शक्ती वंदन अधिनिमय आणण्यात आले. तेव्हा निवडणुकाजवळ असल्यामुळे याच विरोधी पक्षांनी नाइलाजाने त्याला पाठिंबा दिला होता. पण आता केंद्र सरकारकडे बहुमत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी हे विधेयक नाममंजूर केले. जर हे विधेयक मंजूर झाले असेत, तर महिलांना 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येच लोकसभेत 33 टक्के आरक्षण मिळणे शक्य झाले असते. सामान्य कुटुंबातील महिला खासदार व आमदार झाल्या असत्या आणि महिलांना प्रतिनिधीत्व मिळाले असते. मात्र, हे विधेयक लागू झाले तर महिला त्यांच्या घराणेशाहीला आव्हान देतील, अशी भिती विरोधी पक्षाला असल्याने त्यांनी हे विधेयक फेटाळले, असा आरोप आत्राम यांनी लावला. 
 
 
महिला सक्षमीकरणाचा सन्मान करणारे हे विधेयक नामंजूर होताच काँग्रेसह सर्व स्वतंत्र्य पक्षांच्या सदस्यांनी केलेला जल्लोष लज्जास्पद होता. यातून विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पूर्णपणे उघड झाली आहे. विरोधकांच्या या वर्तनाचा आम्ही तीव निषेध करतो. 2029 च्या लोकसभा निवडणूका असोत किंवा त्यापूर्वीच्या विधानसभा आणि स्थानिक निवडणूका असतो, महिला शक्ती हा मुद्दा विसरणार नाही. जे पक्ष या विधेयकाच्या मार्गात आडवे येतील त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल, असेही आत्राम म्हणाल्या. पत्रपरिषदेला महापौर संगिता खांडेकर, महिला मोर्चा अध्यक्ष वंदना शेंडे, माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, जयश्री जुमडे, विद्या देवाळकर, विजया डोहे, प्रिया लांबट, लक्ष्मी सागर, अंजली घोटेकर आदी उपस्थित होत्या.