‘एलएसडी’ ड्रग्जसह दाेन विद्यार्थ्यांना अटक

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
- ‘ऑपरेशन थंडर’चा नवा टप्पा सुरू

अनिल कांबळे
नागपूर, 
शहरात अंमली पदार्थांविराेधातील लढ्यात माेठे यश मिळवत नागपूर पाेलिसांनी Operation Thunder ‘ऑपरेशन थंडर’चा नवा टप्पा सुरू केला आहे. प्र. पाेलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील या माेहिमेत 1.70 लाख किमतीचे एलएसडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, याच कारवाईद्वारे ‘ऑपरेशन थंडर 2.0’ची अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे.
 
 
po
 
Operation Thunder  जायताळा येथील भांगे लेआउट परिसरात दाेन संशयितांना ताब्यात घेतले. घेतलेल्या झडतीदरम्यान 17 एलएसडी डाॅट्स (0.170 ग्रॅम) जप्त करण्यात आले. यासाेबतच माेबाईल ाेन आणि वाहने असा एकूण 4.37 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटक करण्यात आलेले दाेन्ही आराेपी 22 वर्षीय विद्यार्थी असून एमआयडीसी परिसरात राहणारे आहेत. या प्रकरणातील तिसरा आराेपी फरार आहे. एमआयडीसी पाेलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन थंडर 2.0’च्या माध्यमातून नागपूर पाेलिसांनी अंमली पदार्थांविराेधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शहरात ड्रग्सचे जाळे पसरविण्याचा प्रयत्न करणाèयांवर या कारवाईद्वारे वचक बसला आहे.

युवकांना ड्रग्सच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहाेत. सतर्कता, जागरूकता आणि कारवाई हेच आमचे मार्गदर्शक तत्त्व राहतील. नागपूर पाेलिसांनी नागरिक, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, ‘ऑपरेशन थंडर 2.0’ला सहकार्य करून वेळेवर माहिती द्यावी. सामूहिक सतर्कतेतूनच सुरक्षित, निराेगी आणि ड्रगमुक्त नागपूर घडू शकते.
- नवीनचंद्र रेड्डी (प्र. पाेलिस आयुक्त)