अवैध ई-तिकीटिंगविरुद्ध रेल्वेकडून कारवाई
नागपूर,
e-ticket was seized मध्य रेल्वेच्याय नागपूर मंडळामार्फत अवैध ई-तिकीटिंगविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुख्यालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे ठोस कारवाई करण्यात येत आहे. सीआयबी, नागपूरचे एएसआय आर. के. भारती व आरक्षक हरविंदर सिंग यांनी संशयित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून पडताळणीची कार्यवाही सुरू केली. या चौकशीदरम्यान असलम नावाचा व्यक्ती पथकासमोर हजर झाला.
मोबाईलची तपासणी केली असता अनेक पर्सनल युजर आयडींचा गैरवापर करून रेल्वे ई-तिकिटे काढली जात असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे एकूण ७ युजर आयडी आढळून आले, त्यापैकी ६ आयडी सक्रियपणे वापरात होते. या आयडींमार्फत ५ लाइव्ह ई-तिकिटे काढण्यात आली. e-ticket was seized या तिकीटांची एकूण किंमत १३,६०९.८५ तसेच प्रवास पूर्ण झालेली ई-तिकिटे असे एकूण ८३,४०८.७०आढळून आली. चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केले की तो ग्राहकांकडून रेल्वे तिकीटाच्या मूळ भाड्याव्यतिरिक्त प्रति तिकीट ३० ते ५० अतिरिक्त कमिशन आकारून ई-तिकिटे तयार करत होता. या अवैध व्यवहारासाठी तो आपल्या पत्नीच्या नावावरील बँक खात्याचा वापर करत होता.
६७ ई-तिकिटे जप्त
रेल्वे सुरक्षा दलाने ६७ ई-तिकिटे या तिकीटाची एकूण किंमत ९७,०१८.५५ असून आरोपीकडून एक मोबाईल फोन जप्त केला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीसह जप्त साहित्य आरपीएफ, नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. e-ticket was seized मध्य रेल्वे, नागपूर मंडळ प्रवाशांना आवाहन करते की त्यांनी रेल्वे तिकीट बुकिंगसाठी केवळ अधिकृत माध्यमांचा वापर व अनधिकृत एजंटांपासून दूर राहावे.