शेगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
१२ बोर बंदूक व ७० जिवंत काडतुसे जप्त
शेगाव -
Action taken by Shegaon policeशेगाव ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करत १२ बोर बंदूक व तब्बल ७० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. २१ एप्रिल २०२६ रोजी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून शस्त्र, मोटारसायकली, नगदी रक्कम व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी अप. क्र. १३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
 
apdksdk
 
Action taken by Shegaon police तपासादरम्यान आरोपी नामे जमील हुसेन इनामुल्ला (रा. बघाणपूर) याने २१ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेवेळी १२ बोर बंदूक ग्राम जानी येथे लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी २३ एप्रिल रोजी सापळा रचून बंदूक व ७० जिवंत काडतुसे जप्त केली. तसेच तपासात आरोपींनी बघाणपूर येथून शेगाव येथे येण्यासाठी चोरीच्या वाहनाचा वापर केल्याचेही निष्पन्न झाले. या प्रकरणात लाल रंगाची महिंद्रा केयूव्ही १०० (एमएच २८ एफ ६४७६) ही गाडीही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी.एन. जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण लिंगाडे, पोहेकॉ नंदकिशोर तिवारी, पोहेकॉ उमेश आहारे व पोलीस मंगेश पाटकर यांनी केली. पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.