'आप'मधील घडामोडींवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया!

आदर्शांपासून दूर गेल्याचा टोला!

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
anna-hazare-first-reaction : अण्णा हजारे यांनी आम आदमी पक्षातील मोठ्या राजकीय घडामोडींवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे सात राज्यसभा खासदार राजीनामा देऊन बाहेर पडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
 
 
 
anna-hazare-first-reaction
 
 
अण्णा हजारे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आम आदमी पक्ष सुरुवातीला ज्या तत्त्वांवर उभा राहिला होता, त्यापासून तो आता दूर गेला आहे. पक्षाने आपल्या मूळ आदर्शांचा विसर पडल्याचे त्यांनी सूचित केले.
 
त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्वावरही निशाणा साधत, सत्तेसाठी तडजोडी होत असल्याची टीका केली. आंदोलनातून उभ्या राहिलेल्या या पक्षाने स्वच्छ राजकारणाचा संदेश दिला होता, मात्र सध्याच्या परिस्थितीत तो मार्ग बदलल्याचे त्यांनी म्हटले.
 
दरम्यान, आम आदमी पक्षातील या मोठ्या फुटीनंतर राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असून, आगामी काळात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.