आर्वी/आष्टी,
Ashtit forest : आष्टी-वरुड राष्ट्रीय महामार्गांवर १० किलोमीटर अंतरावर असलेले प्रादेशिक वनविभागच्या सहवन क्षेत्र व नियतक्षेत्र पांढुर्णा येथील जंगलाला भीषण आग लागली. यात कुरणाचे रोपवन जळून राख झाले. तर आर्वी येथील नेहरू मार्केट येथील लक्ष्मी किराणा स्टोअर्सला आग लागून मोठे नुकसान झाले. दोन्ही घटना आज शुक्रवार २४ रोजी घडल्या.
Ashtit forest : मिळालेल्या माहितीनुसार, प्रादेशिक वन विभागाच्या आष्टी तालुयातील वन विभागातील हद्दीत सहवन क्षेत्र पांढुर्णा व नियत क्षेत्र पांढुर्णा कक्ष क्रमांक ३८/१, संरक्षित क्षेत्र योजना कॅम्प मधील गवत लागवड, कुरण विकास रोपवन यांच्यावर शासनाचा मोठा निधी खर्च करण्यात आला. २०२४ ते २०२५ पासून १० हेटरवर गवत लागवड करण्यात आली. पण, आगीसारखे संकट उद्भल्यास वेळीच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदाही कोळसा झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे आग लागल्यावर वनविभागाचे कुठलेही अधिकारी व कर्मचारी आग विझविण्यासाठी पोहोचले नव्हते.
आर्वी : स्थानिक नेहरू बाजार येथील हरूमल सेठ ठाकूर यांच्या लक्ष्मी किराणा स्टोअर्सला पहाटे ४ च्या सुमारास आग लागली. आगीत किराणा साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. सकाळी फिरायला जाणार्या तरुणांना दुकानातून धूर निघत असल्याचे दिसले. नगर पालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर पोहोचत आग विझविण्याकरिता प्रयत्न सुरू केले. दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोयात आली. त्यामुळे त्याच ओळीतील दुकाने बचावली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश डेहणकर, पोलिस उपनिरीक्षक संतोष ठाकूर करीत आहे.