भंडारा
Bhandara road accident भंडारा बायपास मार्गाने जात असताना दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात आई वडील आणि मुलगा असे तिघेजण गंभीर नक्की झाले आहेत. आज 24 रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. नागपूर येथील सोमनाथ खरोले आपल्या पत्नी आणि मुलासह दुचाकीने लाखनी कडे जात होते.
दरम्यान भंडारा बायपास मार्गावर अजीमाबाद गावाजवळ सोमनाथ यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्ता दुभाजकाला जाऊन आदळली. या अपघातात सोमनाथ यांच्यासह पत्नी बसंता आणि मुलगा अंकीत गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कारधा पोलिसांना मिळताच त्यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रुग्णवाहिका सेवेशी संपर्क केला. चालक मोहतुरे यांनी तात्काळ घटनास्थळी गाठत जखमीना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचविले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची नोंद कारधा पोलिसात करण्यात आली आहे.