हिंगणघाट,
Bharat Vidyalaya भारत विद्यालयातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी सुरू होताच विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी उन्हाळी छंद शिबिराचे आयोजन भारत विद्यालयात २४ ते २८ एप्रिल दरम्यान सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत केले आहे. शिबिराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक हरीश भट्टड यांच्या हस्ते करण्यात आले.
Bharat Vidyalaya भारत विद्यालयात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विविध शिबिर, उपक्रमं आयोजित केले जातात. उन्हाळी छंद शिबिरात व्यतीगत विकास, कला आणि हस्तकला, मैदानी खेळ, योग, गीत संगीत, अक्षर सुधार, नृत्य व अभिनय आदींचा समावेश आहे. याप्रसंगी भट्टड यांनी शिबिर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० च्या धोरणानुसार आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापक किशोर चवरे यांनी केले. संचालन अर्चना सुरपाम यांनी तर आभार निकीता कामडी यांनी मानले.