बोरधरण पर्यटनस्थळाच्या विकासासाठी नव्याने 4 कोटी मंजूर

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
पालकमंत्री डॅा. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून पर्यटनस्थळाचा विकास
आतापर्यंत 10 कोटी 23 लाख मंजूर

वर्धा : Bordharan tourist spot व्याघ्र प्रकल्पाच्या मधोमध पक्षी, प्राणी आणि निसर्गाच्या कुशीत असलेल्या सेलू तालुक्यातील बोर धरणाचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला जात आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून या स्थळाच्या विकासाला गती आली आहे. पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पासोबतच बोर धरण प्रकल्पात बोटींग व विविध बाबींचा आनंद घेता येणार आहे. या स्थळाच्या विकासासाठी शासनाने नव्याने 4 कोटी रुपये मंजूर केले आहे. पालकमंत्र्यांनी भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. सेलू तालुक्यातील बोर हा महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे येथे वाघाचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर देशभरातून पर्यटक येत असतात. या प्रकल्पाच्या मधोमध आणि निसर्गाच्या कुशीत बोरधरण प्रकल्प आहे. धरणाच्या चहुबाजुने असलेल्या विविध प्रजातींच्या झाडांमुळे हे धरणस्थळ अतिशय देखणे झाले आहे. धरण परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास येथे येणाऱ्या पर्यटकांना दुहेरी आनंद मिळू शकेल. शिवाय परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, यादृष्टीने पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून येथे पर्यटनस्थळ विकसित होत आहे.
 
 

pankaj
 
Bordharan tourist spot त्यादृष्टीने व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना आकर्षिक करण्यासोबतच त्यांना बोटींग व अन्य बाबींचा आनंद घेता यावा यासाठी विकासाची विविध कामे करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात वाढ करण्यात आली. त्यामुळे पर्यटकांना आपआपल्या सोईने नजीकच्या ठिकाणाहून वाघाचे दर्शन घेण्यास जाता यावे यासाठी राहाटी व ढगा हे दोन गेट सुरु करण्यात आले. या गेटसह बोरधरण निसर्ग सफारी गेटवरून पर्यटकांना जाण्यासाठी सफारी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
 
Bordharan tourist spot बोरधरण रेंजमध्ये पॅाली कार्बोनेट शेडसह सीएनसी गेटची व्यवस्था आणि दुरुस्ती तसेच आवश्यक पर्यटन सुविधा विकासाची कामे करण्यात येत आहे. बोटींगसाठी बोरधरण येथे जेटी व पर्यटकांना जेटीपर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. बोरधरण येथे रिसॅार्ट आहे. या रिसॅार्टचा देखील विकास केला जात आहे. याठिकाणी व्हीआयपी सुट, मिटींग हॅाल, फर्निचर व इंटेरियर, विद्युत कामे, स्वयंपाकघर, वसतिगृह आणि डिलक्स खोल्यांचे फर्निचर व इंटेरियल कामे कामे केली जात आहे. सफारी वाहनांसह या सर्व बाबींसाठी 6 कोटी 23 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या वन व निसर्ग पर्यटन योजनेतून पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी मंजूर केला आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत बोरधरण पर्यटनस्थळाचे सौंदर्यीकरण व सोलर लाईटद्वारे विद्युतीकरणासाठी नव्याने 4 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून बोरधरण पर्यटनस्थळ हे भविष्यातील राज्यातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्यासोबतच स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील.
बोरधरण महत्वाचे पर्यटनस्थळ म्हणून उदयास येईल - डॉ.पंकज भोयर
बोरधरण निसर्गाच्या कुशित वसलेले अतिशय सुंदर असे स्थळ आहे. विशेष म्हणजे व्याघ्र प्रकल्पातील हे धरण आहे. त्यामुळे वाघाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसोबतच अन्य पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी हे पर्यटनस्थळ अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे. येथे विविध विकासाची कामे आपण हाती घेतली आहे. भविष्यात भरपुर कामे करण्याचा मानस आहे. या स्थळामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालणा मिळेल, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.