मका भाव फरकाची रक्कम त्वरीत मिळावी : भारतीय किसान संघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
बुलढाणा जिल्ह्यातील आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या परंतू मका खरेदी न झालेल्या शेतकर्‍यांना भाव Buldhana: Maize farmer फरकाची रक्कम मिळावी या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री यांना बुलढाणा जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन देण्यात आले. या मागणीवर १५ दिवसात दिलासा दिला नाही तर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा भारतीय किसान संघ शाखा बुलढाणा यांच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.
 
 
Makka
 
Buldhana: Maize farmer  निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आभासी नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्‍यांची मका खरेदी करणे बाबद अथवा भाव फरकची रक्कम मिळणे बाबद विनंती केली होती. पंरतू शासनाने सर्व शेतकर्‍यांची मका खरेदी न करता दि. ३१ मार्च रोजी खरेदी बंदी केली शासनाने मका खरेदीसाठी आभासी नोंदणीची मुदत दि. २७ ऑक्टोबर २०२५ ते ३१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दिली होती. या काळात जिल्हयातील एकूण ५ हजार ७४९ शेतकर्‍यांनी आभासी नोंदणी केली. या सर्व शेतकर्‍यांची पेर्‍या प्रमाणे अपेक्षीत खरेदी ५ लाख १५ हजार ३४३ क्किंटल होती. परंतू प्रत्यक्षात आभासी नोंदणी केलेल्या फक्त २ हजार ३१३ शेतकर्‍यांची ९८ हजार ७८० क्किंटल मका खरेदी केली गेली उर्वरित ३ हजार ४२६ शेतकर्‍यांची ४ लाख १६ हजार ५६२ क्किंटल मका न मोजताच दि. ३१ मार्च रोजी खरेदी बंद केली. शेतकर्‍यांच्या या असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा घेवून आधारभूत किमत प्रती क्किंटल २ हजार ४०० रूपये असतांना व्यापारी १ हजार ४०० ते १ हजार ५०० या अल्प दराने मका खरेदी करीत आहेत. म्हणजे शेतकर्‍यांच्या ९०० ते १००० रूपये प्रति क्किंटल नुकसान होत आहे म्हणून मका भाव फरकाची रक्कम मिळावी या मागणीचा गांभीयपूर्वक विचार करून शेतकर्‍यांना १५ दिवसात दिलासा द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय किसान संघ शाखा बुलढाणा यांच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष अशोक कुळकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष नंदकूमार खडके, जिल्हामंत्री राजेंद्र इंगळे, तालुका अध्यक्ष दत्तात्रय टेकाळे, तालुका उपाध्यक्ष अशोक राजपूत, कार्यकारणी सदस्य विनायक गोडबोले हे उपस्थित होते.