राज्यसभा निवडणुकीच्या जागेबद्दल निर्णय घ्या

काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Vijay Wadettiwar आगामी विधान परिषदेच्या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लढणार असतील तर त्याचे स्वागत आहे. मात्र उद्धव ठाकरे निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल. राज्यसभेच्या जागी कोणत्या उमेदवार असेल याबाबत आताच निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट भूमिका पत्रपरिषदेत मांडली.

 
Vijay Wadettiwar
 
महिला आरक्षणाचा प्रश्न सन्मानाचा मुद्दा
मुख्यत: उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. या निवडणूकीत उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊ, मात्र पुढील राज्यसभा निवडणुकीच्या जागेबद्दल निर्णय घेण्याची गरज विजय वडेट्टीवर व्यक्त केली. Vijay Wadettiwar ते पुढे म्हणाले, २०२३ मध्ये महिला आरक्षणाचे विधेयक आले, तेव्हा काँग्रेसने याला समर्थन दिले होते आणि एकमताने ते मंजूर झाले होते.तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी काँग्रेसला श्रेय दिले होते का? आता जे विधेयक आणले होते त्यात नारी शक्तीचा उल्लेख कुठे होता? असा प्रश्न केला. महिला आरक्षणाच्या नावाखाली फक्त राजकीय घेण्याचा प्रयत्न होत आहे. महिला आरक्षणाचा प्रश्न हा मतांचा खेळ नसून सन्मानाचा मुद्दा आहे.