मुंबई,
mns-leaders-arrested : मुंबईत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असून, दहिसर परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी मनसेच्या ११ नेत्यांना अटक केली आहे.
माहितीनुसार, मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नयन कदम, कुणाल माईणकर आणि किरण नकाशे यांच्यासह एकूण ११ जणांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्या सर्व आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले असून, विविध राजकीय पक्ष आपापली भूमिका मांडत आहेत. या घटनेमुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.