आयपीएल सामन्यावर क्रिकेट सट्टेबाजी

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
- 7 क्रिकेट बुकींना अटक

अनिल कांबळे
नागपूर, 
Cricket Satta आयपीएल क्रिकेट स्पर्धा सध्या रंगात आली असून मुंबई आणि चेन्नई संघादरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजीची खायवाडी करणाèया टाेळीचा गुन्हे शाखेने पर्दााश केला. पाेलिसांनी 7 क्रिकेट बुकींना अटक केली. गुरुवारी रात्री सदर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हर्षल देवेंद्र देवघरे (वय 24, रा. तांडापेठ), अभयसिंह ठाकूर (वय 32, रा. जबलपूर), प्रभात ऊफर् भुरू प्रभाकर पाठराबे (वय 32, रा. बाेहरा वस्ती, इतवारी), माेवेश सय्यद (वय 22, रा. शांतीनगर), अब्दुल अयान अब्दुल लतीफ खान (वय 22, रा. सेवासदन चाैक, गणेशपेठ ), हमीद रजा माे. बशीर (वय 25, रा. सतरंजीपुरा)आणि अब्दुल तनवीर अब्दुल मजीद (वय 29, रा. गांजाखेत) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत.
 
 
satsta
 
Cricket Satta आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या टी-20 सामन्यावर माेठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यात आराेपी माेबाईल व संगणकाच्या सहाय्याने क्रिकेट सामन्यांवर सट्ट्याची खायवाडी करीत असल्याचे आढळले. तपासादरम्यान या रॅकेटचा विस्तार धक्कादायक असल्याचे समाेर आले. छत्तीसगडमधील एका बुकीने नागपुरात भाड्याने घर घेऊन हे जाळे उभारले हाेते. या साखळीत नागपूरसह जबलपूर आणि गाेंदिया येथील काही जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आराेपींकडून सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे माेबाईल ाेन, संगणक व इतर साहित्य असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आराेपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 5 दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएलच्या काळात सट्टेबाजीचे प्रमाण वाढत असल्याने पाेलिसांनी अशा रॅकेटविराेधात माेहीम तीव्र केली आहे. या प्रकरणाचा सखाेल तपास सुरू असून मुख्य सूत्रधारांचा शाेध घेतला जात आहे. ही कारवाई प्रभारी पाेलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पाेलिस निरीक्षक दिलीप चंदन यांच्या पथकाने केली.
 
 
प्रकरणात छत्तीसगड ‘कनेक्शन’
आराेपी दूरध्वनी व संगणकाच्या माध्यमातून क्रिकेट सामन्यांवर सट्टा स्वीकारत हाेते. आयपीएल सामन्यांच्या काळात माेठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण केली जात हाेती. छत्तीसगडमधील बुकीच्या मेहरनजरेने नागपुरात भाड्याने घेतलेल्या घरातून हे रॅकेट चालवले जात हाेते. विविध ठिकाणांहून सहभागी हाेत साखळी पद्धतीने सट्टेबाजी केली जात हाेती. पाेलिसांनी सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.