डिजिटल जनगणनेत नागरिकांनाही स्व-गणना करता येणार

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
१ मे पासून आभासी माहिती भरण्याची सुविधा
नागरिकांनी स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा
जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन

यवतमाळ, 
Digital census भारताच्या १६ व्या जनगणनेचे कामकाज सुरू झाले आहे. राज्यात १ मे पासून डिजिटल जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची सुरवात होणार आहे. त्याअंतर्गत शासनाने स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलवरून स्व-गणना करून राष्ट्रीय कार्यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
 
 
Digital census
 
या Digital census  जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना आभासी स्व-गणना करता येणार आहे. या स्व-गणनेत नागरिकांना स्वत:सह कुटुंबांची भरता येणार आहे. त्यासाठी भारत सरकारच्या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या मोबाईल क‘मांकाद्वारे लॉगिन करावे. त्यानंतर जिओ लोकेशन समाविष्ट करून कुटुंबाबाबत विचारण्यात येणार्‍या सर्व प्रश्नांची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर त्याचा ११ अंकी एसई क‘मांक तयार झाल्यानंतर तो जतन करून ठेवावा. हा ११ अंकी क‘मांक १५ मे नंतर येणार्‍या प्रगणकाला देऊन जनगणना प्रकि‘या पूर्ण करावी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. या जनगणना मोहिमेतील स्व-गणना प्रकि‘या सुरक्षित, सुलभ व सोयीस्कर आहे. जनगणनेचे संकेतस्थळ इंग‘जी, हिंदी व प्रादेशिक भाषेत उपलब्ध आहे. या मोहिमेत नागरिकांनी सक‘ीय सहभाग घेवून स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.