-नागपूर येथून २६ मे रोजी प्रस्थान
नागपूर,
Divya Dakshin Yatra Gadi दक्षिण भारतातील प्रमुख आध्यात्मिक स्थळांना एकाचवेळी भाविकांना भेट द्यावी, या उद्देशाने ’इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिजम कापोर्रेशन लिमिटेड’ (आयआरसीटीसी) तर्फे दिव्य दक्षिण यात्रा’ ही पर्यटक रेल्वेगाडी चालविण्यात येत आहे. नागपूर येथून ’दिव्य दक्षिण यात्रा गाडी २६ मे रोजी प्रस्थान माहिती आयआरसीटीसीचे मॅनेजर टूरिझम सुभाष नायर यांनी पत्रपरिषदेत दिली.
दिव्य दक्षिण यात्रा’ ११ रात्री व १२ दिवसांची असून या दौर्यात हंपी, म्हैसूर, कोईम्बतूर, तिरुवनमलाई, वेल्लोर, रेनिगुंटा आणि मल्लिकार्जुन या धार्मिक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाणांच्या भेटींचा समावेश आहे. या गाडीत प्रवाशांसाठी भोजन व्यवस्थ, प्रवास प्रेक्षणीय स्थळे बघणे, कोचमध्ये सुरक्षा रक्षक व राहणार आहे. प्रती व्यक्तीसाठी गाडीच्या शयनयानसाठी २१ हजार ६९० रुपये, तृतीय श्रेणी वातानुकूलितसाठी ३६ हजार ७४० रुपये व द्वितीय श्रेणी वातानुकूलितसाठी ४८ हजार ७३० रुपये तिकीटदर आहेत. विशेष म्हणजे गाडीला वर्धा, बडनेरा, अकोलासह भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपूरी, कल्याण व पुणे या स्थानकांवर चढण्यासह उतरण्याचे पर्याय उपलब्ध करून आले आहेत. नागपूर मुख्य स्थानकावरी प्लॅटफॉर्म-१ वरील आरक्षण केंद्राजवळ किंवा आयआरसीटीसी संकेतस्थळावर ’दिव्य दक्षिण यात्रा’ गाडीचे तिकीट बुक करता येईल, अशी माहिती आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए.के. सिंग, अमोल हळदनकर, निखिल नाईक, संजय यादव यांनी दिली.
पुण्यातून पर्यटक ट्रेन २५ जूनपासून सुरू
Divya Dakshin Yatra Gadi आयआरसीटीसी तर्फे ’भारत गौरव’ विशेष पर्यटक पुणे रेल्वे स्थानकावरून पुरी-कामाख्या-बैद्यनाथ धाम अशी धार्मिक यात्रा २५ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. यात्रा एकूण १२ दिवसांची असून याबाबतची माहिती आयआरसीटीसीचे पश्चिम विभाग प्रवक्ते डॉ. ए. के. सिंह यांनी दिली. या यात्रेत जगन्नाथ मंदिर (पुरी), कामाख्या मंदिर (गुवाहाटी), बैद्यनाथ धाम (जसीडीह), काशी विश्वनाथ मंदिर (वाराणसी) तसेच राम जन्मभूमी (अयोध्या) या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व सुविधा असलेल्या या सुरुवात प्रति व्यक्ती २२,७७० रुपयांपासून करण्यात आली आहे. या विशेष ट्रेनसाठी पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव जंक्शन, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर या स्थानकांवर चढण्याची व उतरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली प्रवासी आपल्या सोयीप्रमाणे इकोनॉमी स्लीपर (एसएल), स्टँडर्ड ३ तसेच कम्फर्ट २ एसी या श्रेणींमधून पर्याय निवडू शकतात. या ट्रेनची एकूण क्षमता ७५० प्रवाशांची असून किमान ४५० प्रवाशांनी आरक्षण केल्यासच ही गाडी चालविण्यात येणार असल्याची माहिती आयआरसीटीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय शर्मा यांनी दिली.