- 3.32 लाखांच्या ई सिगारेट जप्त
अनिल कांबळे
नागपूर,
E-cigarette sales शासनाने प्रतिबंधित केलेल्या ई-सिगारेटची छुप्या पद्धतीने शहरात सर्रास विक्री सुरु आहे. ई सिगारेटची युवा पीढीसह शालेय विद्यार्थ्यांना सवय लागली आहे. त्यामुळे शाळकरी मुली आणि मुलांमध्ये ई सिगारेटचे व्यसन वाढत आहे. यादरम्यान, शहरात पाेलिसांनी ई सिगारेटची विक्री करणाèया तस्कराविरुद्ध गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विराेधी पथकाने कारवाई केली. पाचपावली पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील बाबा बुद्धनगर भागात छापा टाकून पाेलिसांनी 2 लाख 2 हजार रुपयांच्या 112 ई-सिगारेट जप्त केल्या. या प्रकरणी पाेलिसांनी आराेपी वैभव कांबळे याला ताब्यात घेतले आहे.
E-cigarette sales ठाणेदार बाबुराव राऊत यांना गुरूवारी रात्री पाचपावली हद्दीत ई-सिगारेटची तस्करी हाेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी बाबा बुद्धनगर, गल्ली क्रमांक 2 येथील रहिवासी वैभव विकास कांबळे (29) याच्या घरावर पंचासमक्ष छापा टाकला. झडती दरम्यान आराेपीच्या ताब्यातून विविध नामांकित कंपन्यांच्या आणि वेगवेगळ्या फफ्लेवर्सच्या एकूण 112 ई-सिगारेट मिळून आल्या. स्वत:च्या आर्थिक ायद्यासाठी वैभवने या प्रतिबंधित ई-सिगारेट विक्रीसाठी साठवून ठेवल्या हाेत्या. पाेलिसांनी घटनास्थळावरून ई-सिगारेटसह एक दुचाकी आणि एक माेबाईल असा एकूण 3 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आराेपी वैभव कांबळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपीला मुद्देमालासह पाचपावली पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.