- नागपूरसह मुंबई, दिल्ली आणि हैदराबादमधील तस्करांवर गुन्हे दाखल
अनिल कांबळे
नागपूर,
Fake medicine शांतीनगर परिसरात सुरु असलेला बनावट औषधांची विक्री करणाèया एका आंतरराज्यीय टाेळीचा पर्दााश अन्न व औषध प्रशासनाने केला. अल्ब्युर नावाच्या बनावट औषधाचा साठा करून लाेकांच्या आराेग्याशी खेळ करणाèया सहा विविध संस्था आणि व्यक्तींविरुद्ध शांतीनगर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Fake medicine प्राप्त माहितीनुसार, औषध निरीक्षक प्रशांत रामटेके (49) हे शहरात नियमित औषध तपासणी करत असताना, त्यांना तुळसीनगर काॅलनीतील मेसर्स हिताशी ाॅर्मास्युटीकल्स या दुकानात संशयास्पद हालचाली आढळल्या. तपासणी दरम्यान, या ठिकाणी अल्ब्युर या बनावट औषधाचा माेठा साठा विक्रीसाठी ठेवल्याचे निदर्शनास आले. हे औषध अधिकृत नसून बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासात नागपुरातील या विक्रेत्याने केवळ स्थानिक स्तरावरच नव्हे, तर देशातील विविध शहरांमधील वितरकांशी संगणमत करून हे रॅकेट चालवले हाेते. यामध्ये मुंबई, हैदराबाद, पनवेल, दिल्ली आणि चंदीगड येथील निर्मात्यांचा व वितरकांचा समावेश आहे. 19 सप्टेंबर 2025 ते 17 डिसेंबर 2025 या कालावधीत या बनावट औषधांची माेठ्या प्रमाणावर विक्री करून जनतेच्या जीविताला धाेका निर्माण करण्यात आला. या प्रकरणी औषध निरीक्षक प्रशांत रामटेके यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पाेलिसांनी सर्व आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या बनावट औषधांचा पुरवठा काेणाकाेणाला करण्यात आला, याचा पाेलिसांकडून शाेध घेतला जात आहे.
या कंपन्यांचा आहे सहभाग
या बनावट औषध विक्रीच्या टाेळीमध्ये मेसर्स हिताशी ाॅर्मास्युटीकल्स (शांतीनगर, नागपूर), मेसर्स एन.आर.एन. मित्र डिस्ट्रीब्युटर्स (मुंबई), मेसर्स एन.आर. मित्र डिस्ट्रीब्युटर्स (हैदराबाद), मेसर्स आर.आर.टी. ार्मा (पनवेल), दानिश खान (दिल्ली) आणि राजकुमार मिश्रा (चंदीगड) या कंपन्यांचा समावेश आहे.