सेंट्रल बँकेच्या सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद
मारेगाव,
Female thief: Cash theft दोन रुपयांच्या झेरॉक्ससाठी बँकेच्या बाहेर जाणे एका तरुणाला महागात पडले. गर्दीचा फायदा घेत चोरट्या महिलांनी ब्लेडने बॅग कापून ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. मारेगाव येथील सेंट्रल बँक शाखेत भरदिवसा घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. तक‘ारदार राहुल किसन भरडे (वय २८, डोमा, जि. चंद्रपूर) हे खापरी येथील सबस्टेशनमध्ये ऑपरेटर आहेत. धान विक‘ीचे १ लाख रुपये मित्र वैद्य याच्या खात्यावर आले होते. २० एप्रिल रोजी दोघे पैसे काढण्यासाठी मारेगावच्या सेंट्रल बँकेत आले.
Female thief: Cash theft सुरुवातीला ५० हजार रुपये काढून राहुल यांनी बॅगमध्ये ठेवले. उर्वरित ५० हजार काढण्यासाठी पॅनकार्ड लिंक करणे आवश्यक होते. त्यासाठी झेरॉक्स काढण्याकरिता राहुल बॅग बाकावर ठेवून मित्रासोबत बँकेबाहेर गलेे. परत आल्यावर बॅगच्या आतील बाजूस चिरा व ५० हजार रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेच्या दिवशी ड्युटीवर जाणे आवश्यक असल्याने राहुल तक‘ार देऊ शकले नाहीत. २२ एप्रिल रोजी त्यांनी मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. शंकर बारेकर पुढील तपास करीत आहेत.
सीसीटीव्हीत संशयास्पद महिला
चोरीचा संशय आल्याने राहुल यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात तोंडाला स्कार्फ बांधलेल्या दोन महिला राहुल यांच्या मागे-मागे फिरताना दिसल्या. या महिलांनीच गर्दीचा फायदा घेऊन बॅगला ब्लेडने चिरा मारून पैसे चोरल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे बँक परिसरातील नागरिकांच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन रुपयांच्या कामासाठी बॅग बेवारस सोडल्याने ५० हजारांचा फटका बसला. पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.