दारव्हा,
Hindu Sammelan जो या देशात राहतो, तो भारताला आपली माता मानतो, तो हिंदू होय. पूजा पद्धती, उपासना पद्धती वेगळी असेल तरी चालेल. ‘भारत माता की जय’ त्यांनी पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते आनंद पांडे यांनी साईमंदिर येथे झालेल्या विशाल हिंदू संमेलनात केले. आशीर्वचनात विशाल बढे यांनी, ही संतांची भूमी असून भगवंतानेदेखील हीच भूमी निवडली. संस्कार, संस्कृती ही आपली ओळख आहे. समाजात जागृत असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. शहरातील शिवाजीनगरात विशाल हिंदू संमेलनात बोलताना ते पुढे या देशाला आपला देश समजतो तो हिंदू आहे. हिंदू धर्म नसून ही संस्कृती आहे. जातीमधील सामाजिक समरसता दूर करत असताना आर्थिक विषमतासुद्धा दूर केली पाहिजे. या सर्वांवर एकच उपाय आहे ती म्हणजे आपल्या विचारांमध्ये समरसता आणणे. आचरणात समरसता आणण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
Hindu Sammelan आपल्याकडील सण उत्सवात सर्व जाती, लोकांना आपण बोलावलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्या घरात छोटे-छोटे हिंदू संमेलन होणे गरजेचे आहे. तसेच कुटुंब प्रबोधन, समरसता, स्वबोध, नागरी कर्तव्य, पर्यावरण या पंच परिवर्तनाची गरज आहे, असेही मत आनंद पांडे यांनी व्यक्त केले. या हिंदू संमेलनाला विशाल बडे यांनी आशीर्वचन दिले. यावेळी साईमंदिराचे बावने महाराज उपस्थित होते. सुरवातीला मंडळ हरीपाठ मंडळांनी नगरफेरी काढून जनजागृती केली. मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक साईमंदिराचे विश्वस्त गणेश दुधे यांनी, संचालन किशोर जयस्वाल यांनी, तर आभार विशाल गंडाळे यांनी मानले. भारतमातेची आरती विभागाचे दायित्व असलेले अमोल शेलोकर यांनी केली. इतिहासावर आधारित वेशभूषा ध‘ुविका रवी क्यास्ते, वेदांती रवी क्यास्ते यांनी सादर चतुर हिने शिवगर्जना सादर केली. संमेलनासाठी प्रभागातील नगरसेवक धनंजय बलखंडे, रवी क्यास्ते तसेच मित्रपरिवार व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.