वर्धा,
Indefinite strike पेन्शनसह शिक्षक, कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ४ दिवसांपासून राज्यभर सुरू असलेल्या बेमुदत संपाला प्रतिसाद मिळत नसल्याने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने राज्यभर आक्रमक भूमिका घेत आज २४ रोजी जिल्हास्तरावर मोर्चा काढण्यात आला. वर्धेत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक धाबर्डे, सरचिटणीस पंकज आगलावे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासुन जिल्हधिकारी कार्यालयावर मोर्चा आंदोलन काढण्यात आला.
Indefinite strike पेंशन योजनेंतर्गत सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तात्काळ जारी करणे, संघटनेशी दोन महिन्यातून एकदा सभा लावणे, टीईटी पात्रता परीक्षा सरसकट सर्व शिक्षकांवर न लादणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुत शिक्षक, कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे, आदी मागण्यासाठी बेमुदत संप गेल्या ४ दिवसांपासून सुरू आहे. मोर्चात राज्य कर्मचारी, निमसरकारी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीचे दीपक धाबर्डे, पंकज आगलावे, प्रशांत भोयर, राखी जयस्वाल, हरिश्चंंद्र लोखंडे, अजय भोयर, विनोद भालतडक, ओंकार धावडे, छाया देशपांडे, रेखा तडस, आदींसह सर्व विभागातील कर्मचारी मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते.